आर्याभारताच्या वनपर्वाच्या अंतर्गत - नलपर्व
आर्याभार तां तर्गत वनपर्वा तील ४था अध्याय नलोपाख्यानपर्व श्रीवीरसेनसुत नळ निषधेश्वर सुगुणमणिकरंडक हो । ब्रह्मण्यप्रभु दुर्गतदारिद्र्यसमुद्रवरतरंडक हो ॥१॥ वीरसेनाचा मुलगा "नल", निषध देशाचा अधिपति, उत्तमगुणरूपी मण्यांनी भरलेला करंडा (दागिने ठेवण्याचा पेटारा) होता. तो ब्रह्मण्य म्ह. ब्राह्मणांचे हित चिंतणारा किंवा ब्राह्मणांना आश्रय देणारा, तसेच अ भाग्यवश (दुर्गतिने) दरिद्रतारूपी समुद्रामध्ये बुडत असलेल्यांसाठी उत्तम नौकाच (तरंडक) होता. अर्थात् तो अतिशय दानशूर होता. तो पुण्यश्लोक रणी करिता रिपुवीरहानि वासवसा । तत्कीर्ति म्हणे, "गी-श्री-धी हो! या, योग्य हा निवास, वसा." ॥२॥ तो पुण्यश्लोक (पावन कीर्ति असलेला) नळ राजा युद्धामध्ये इंद्राप्रमाणे (वासव म्ह. इंद्र) शत्रूंच्या वीरांची हानि करीत असे. त्याची कीर्ति , "हे वाणि! हे लक्ष्मि! हे बुद्धे! तुम्ही सर्व जणी या नळाच्या ठिकाणी रहायाला या. हा तुम चा निवास म्हणून योग्य आहे." अ से म्हणत असे. अर्थात् त्याच्या शुद्ध आचार - धार्मिक्...