Posts

कृष्णविजय - अध्याय पंधरावा - भगवंतांनी केलेली बलरामस्तुति (English Translation)

Image
या चरितोपरि साव्या वर्षींच्या कृष्णसत्कथा परिसाव्या. Now furthermore in this account, the good stories from K ṛ ś na 's sixth year should be listened to.  येथे नित्य नवि रती; याविण विषयांत होय सत्य न विरती. In these stories, the mind is engrossed with continuously renewed interest; without them, there is truly no detachment from sensory pleasures. हरि बळ सहशिशु वृंदाविपिनी चारिति महासुखे पशुवृंदा. With great joy, K ṛ ś na and Balar ā ma along with their childhood friends graze their cattle in the V ṛnda forest. याची शोभा नमना योग्य​, नुरवि मन्मथाचिया भान मना. The beauty of this scene is worthy of obeisance, for it makes even the God of Love lose himself. रक्षिति हे वन माळी ऋतु सादर सर्व ही; धणी वनमाळी. This forest is well-kept by the gardeners none other than the Six Seasons, all in readiness for their Lord who adorns the garland of forest flowers. पाहुनि पदवि, भुलावी कां न श्री, जीस नित्य पद विभु लावी? Looking at the forest path created by her Lord's feet, how would Lak śmI...

आर्याभारताच्या वनपर्वाच्या अंतर्गत - नलपर्व​

  आर्याभार तां तर्गत  वनपर्वा तील​  ४था अध्याय​ नलोपाख्यानपर्व​ श्रीवीरसेनसुत नळ निषधेश्वर सुगुणमणिकरंडक हो । ब्रह्मण्यप्रभु दुर्गतदारिद्र्यसमुद्रवरतरंडक हो ॥१॥ वीरसेनाचा मुलगा "नल​", निषध देशाचा अधिपति, उत्तमगुणरूपी मण्यांनी भरलेला करंडा (दागिने ठेवण्याचा पेटारा) होता. तो ब्रह्मण्य म्ह​. ब्राह्मणांचे हित चिंतणारा किंवा ब्राह्मणांना आश्रय देणारा, तसेच​  अ भाग्यवश (दुर्गतिने) दरिद्रतारूपी समुद्रामध्ये बुडत असलेल्यांसाठी उत्तम नौकाच (तरंडक) होता. अर्थात् तो अतिशय दानशूर होता. तो पुण्यश्लोक रणी करिता रिपुवीरहानि वासवसा । तत्कीर्ति म्हणे, "गी-श्री-धी हो! या, योग्य हा निवास, वसा." ॥२॥ तो पुण्यश्लोक  (पावन कीर्ति असलेला)   नळ राजा ​ युद्धामध्ये इंद्राप्रमाणे (वासव म्ह​. इंद्र​) शत्रूंच्या वीरांची हानि करीत असे. त्याची कीर्ति , "हे वाणि! हे लक्ष्मि! हे बुद्धे! तुम्ही सर्व जणी या नळाच्या ठिकाणी रहायाला या. हा तुम चा  निवास  म्हणून​  योग्य आहे."  अ से म्हणत असे.  अर्थात्  त्याच्या शुद्ध आचार - धार्मिक्...

मोरोपंतकृत​ कृष्णविजयातील प्रकरणे - ३. "ब्रह्मस्तुति"

Image
  माथा पादरज्याते घे, स्मरती साधुसंघ सादर ज्याते; । जोडुनिया हस्त वनप्रभवोद्भव करि दयांबुवाहस्तवन.​ ॥१॥ "तनुरुचिजितजलदघटा! गुंजाशिखिपिच्छभूषणा! कनकपटा! । स्तविन तुला वनमाळाशृंगकवळवेणुवेत्रधरगोपाळा! ॥२॥ नमन तुला भवशमनाखंडलमुखदेववंदिता! भवशमना! । स्वचरणनिरतमुनिधना! लीलाकृतविश्वसंभवावननिधना! ॥३॥ धन्य म्हणो, वरदेशा! या श्रीवृंदावना किती वरदेशा! । हिंडति पदकमनीयाकृति जेथे, यद्रजोंश पदक मनी या. ॥४॥ होय सकृप​, योज जनीं या तव, नाभ्यमृतस​ध्रदपयोजजनि । मी जरि, तरि यवसाचे या वनिच्या भाग्य हे सदवयव साचे. ॥५॥ श्रुतिशास्त्रनयज्ञांही रचिताही तृप्ति बा तुज न यज्ञाही । गोगोपीस्तनपाने त्वा धरिली तृप्ति तत्सुते जनपाने. ॥६॥ करुणेचा उदधी न त्वत्सम, सर्वेश तू स्वजनहृदधीन​ । हा काम हि मागाया दे मति, जन्मांतरी हि महिमा गाया." ॥७॥

मोरोपंतकृत​ कृष्णविजयातील​ प्रकरणे - २. "बाळक्रीडा"

 वसुदेवोक्ते भर्गप्रतिम ज्ञानी विवेकजितषड्वर्ग​ प्रेमभरे अपवर्ग​-प्रदपद देखावया व्रजा ये गर्ग​ विप्रोत्तम हा नंदे पूजियला सविधि नमुनि सुमहानंदे नामकरण त्याकरवी पुत्रांचे गुप्त उक्तरीत्या करवी भूतभविष्यत्कथन प्रकट करी परि न तो रहस्य विमथन​ “संकर्षण”, “राम”, “बळ” ज्येष्ठाख्या हा द्विषज्जनविरामबळ​ दुसऱ्यास सुखनिधाने “कृष्ण” तथा “वासुदेव” ही अभिधाने x-x-x लागति रांगायाला करिति चरित्रे कवीश्वरां गायाला ते दोघे भाउ रती व्रजनयना देति नान्यशोभा उरति करिति उदार कलीला नाशाया प्रेक्षणीय दारकलीला हरिति मन भ्रम हेला-मात्रे सुख पावती अदभ्र महेला हळु हळु रांगति, लाजे श्री मनि, दे, ते मुनीश्वरां गतिला जे ते सदुदार करीती लीला गोष्ठांत गोपदारकरीती लघु-मंजुळ-सिंजित की लेवविली भूषणें; मधुरसी जितकी ऐकुनि कुतुक मनी या जननीच्या देति करुनि गति कमनीया लघुगति करित मुरडणे जननिकडे जनभये सुचकित मुरडणे तनु भरिती जंबाळे, गळा बळे घालिती मिठी जैं बाळे दाटे पान्हा थानी, सेवावा आग्रहे जगन्नाथानी घेउनिया उत्संगी स्तनपानी सावरूनिया हृत्संगी मुग्ध-स्मित-मित-रदन-श्री-वदन विलोकिती सुखाचे सदन​ हर्षविती जननि, करी अवलंबुनि ...

श्रीमयूरकविकृतेषु - संस्कृतकाव्येषु - मन्त्ररामायणम् ।

Image
॥ मङ्गलाचरणम् ॥ श्री रामं मुदिरश्यामं वन्देऽहं देवनायकम् । सदा वदान्यप्रवरं प्रणतेप्सितदायकम् ॥१॥ रा कापतिमुखीं देवीं वन्दे सीतां महासतीम् । यस्याः सद्व्रतसामर्थ्याच्छमिता अमिता द्विषः ॥२॥ म हामतीन्सदा वन्दे लक्ष्मणादि रघूद्वहान् । येषां पुमर्थाः स्वप्नेऽपि परमा न रमाधवात् ॥३॥ ज गद्गुरुगुरुं वन्दे वसिष्ठं तपसां निधिम् । द्विजराज इति प्राहुर्य सर्वे ब्राह्मणाः सुराः ॥४॥ य स्तपस्वीश्वरः साक्षान्महादेव इव प्रभुः । वन्दे तं गाधिजं तेजोनिधिना विधिना समम् ॥५॥ रा शिं सुतपसां शुद्धज्ञानदानविशारदम् । नारदं सन्मुनिं वन्दे भवाब्धेः परपारदम् ॥६॥ म नोज्ञं रामचरितं येन गीतं सविस्तरम् । वाल्मीकिं तमहं वन्दे मन्देष्टशतसाधकम् ॥७॥ ज गत्प्राणसुतं वन्दे हनूमन्तं महौजसम् । यः श्रीरामकथासिन्धौ चेतसा वेतसायितः ॥८॥ य शस्विप्रवरं वन्दे सुग्रीवं वानरेश्वरम् । सम्प्राप्तौ हेतुरार्याया भार्याया राघवस्य यः ॥९॥ ज लधौ येन रचितः सेतुर्हेतुर्जयश्रियः । तं नलं वानरं वन्दे यं देवाः धन्यमूचिरे ॥१०॥ य त्नं ये चक्रुरनिशं जाम्बवत्प्रमुखा भृशम् । तानृक्षानङ्गदादीन्श्च वन्दे रामानुगान्कपीन् ॥११॥ रा जश्रेष्ठं दशरथं कौसल्याद्या...

मोरोपंत - सीतागीत (रामायण अभंग)

Image
यज्ञासाठी भूमी । नांगरीता धन्या । सांपडली कन्या । सीतादेवी ॥ जनकाची पुत्री । दुर्जना दुर्मिळा । ती भार्या उर्मिळा । लक्ष्मणाची ॥  जनकाचा बंधू। होता येकनिष्ठ । वयाने कनिष्ठ । श्रेष्ठ गुणे ॥ तेणे भरतासी । मांडवी दुहिता । दिली, जी सुहिता । दोही कुळी ॥ शत्रुघ्नाला दिली । दुजी श्रुतकीर्ती । जीची गाती कीर्ती । पतिव्रता ॥ चवघी बहिणी । भाग्ये जाल्या जावा । त्यांचा गीती गावा । सुसंवाद ॥ वनवासवृत्त । सीतेसी पुसती । प्रेमे त्या सुसती । तिघीजणी ॥  सीता म्हणे - ऐका । वनवासकथा । परि मनी व्यथा । न धरावी ॥ चित्रकूटाहूनि । पादुका घेऊनी । वियोग देउनी । तुम्ही आला ॥ आम्हीही तेथूनी । तसेच निघालो । वनात रिघालो । तिघेजण॥  लक्ष्मण भावोजी । मागे पुढे स्वामी । मज आहे धामी । ऐसे वाटे ॥ न बाधेचि मज । उष्ण क्षुधा तृषा । तुम्हांपासी मृषा । न बोलावे ॥ जेव्हा काही वाटे । चालता मी भागे । मुरडोनि मागे । विलोकीती ॥  बाई काय सांगो । स्वामींची ती दृष्टी । अमृताची वृष्टी । मज होय ॥  अत्रीच्या आश्रमी । नेले मज वाटे । माहेरचि वाटे । खरेखुरे ॥  अनसूया सती । करी वेणीफणी । आनंदाची धणी । दिली मज ॥...

मोरोपंत - केकावली

Image
सदाश्रितपदा सदाशिवमनोविनोदास्पदा   । स्वदासवशमानसा कलिमलान्तका कामदा   । वदान्यजनसद्गुरो प्रशमितामितासन्मदा   । गदारिदरनन्दकाम्बुजधरा नमस्ते सदा ।।१।। हा पहिला श्लोक नमनाचा आहे. यामध्ये भगवान् श्रीविष्णूंच्या स्तुत्यर्थ आठ विशेषणे आहेत, आणि नंतर, "तुला सदैव नमस्कार असो" असे म्हटले आहे.  सदाश्रितपदा    हे सज्जन ज्याच्या पायांशी आश्रित आहेत अशा!  सदाशिवमनोविनोदास्पदा  हे सदाशिवाच्या मनास आनंद देणाऱ्या! किंवा, शिवाच्या मनास नेहमी आनंद देणाऱ्या!  स्वदासवशमानसा  हे आपल्या दासांच्या, भक्तांच्या मनाला वश होणाऱ्या!  कलिमलांतका  हे कलियुगाच्या मलाचा म्हणजेच पापाचा नाश करणाऱ्या!  कामदा   हे इच्छित देणाऱ्या!  वदान्यजनसद्गुरो  हे थोर दानी लोकांच्या स्वामी! म्हणजेच, दानीजनांमध्ये श्रेष्ठ अशा!  प्रशमितामितासन्मदा  हे अनेक (अमित) दुष्टांच्या (असत्) मदाचे शमन केलेल्या (प्रशमित+अमित+असत्+मदा)!  गदारिदरनन्दकाम्बुजधरा  हे गदा, चक्र, शंख...