मोरोपंतकृत​ कृष्णविजयातील प्रकरणे - ३. "ब्रह्मस्तुति"


 

माथा पादरज्याते घे, स्मरती साधुसंघ सादर ज्याते; ।
जोडुनिया हस्त वनप्रभवोद्भव करि दयांबुवाहस्तवन.​ ॥१॥

"तनुरुचिजितजलदघटा! गुंजाशिखिपिच्छभूषणा! कनकपटा! ।
स्तविन तुला वनमाळाशृंगकवळवेणुवेत्रधरगोपाळा! ॥२॥

नमन तुला भवशमनाखंडलमुखदेववंदिता! भवशमना! ।
स्वचरणनिरतमुनिधना! लीलाकृतविश्वसंभवावननिधना! ॥३॥

धन्य म्हणो, वरदेशा! या श्रीवृंदावना किती वरदेशा! ।
हिंडति पदकमनीयाकृति जेथे, यद्रजोंश पदक मनी या. ॥४॥

होय सकृप​, योज जनीं या तव, नाभ्यमृतस​ध्रदपयोजजनि ।
मी जरि, तरि यवसाचे या वनिच्या भाग्य हे सदवयव साचे. ॥५॥

श्रुतिशास्त्रनयज्ञांही रचिताही तृप्ति बा तुज न यज्ञाही ।
गोगोपीस्तनपाने त्वा धरिली तृप्ति तत्सुते जनपाने. ॥६॥

करुणेचा उदधी न त्वत्सम, सर्वेश तू स्वजनहृदधीन​ ।
हा काम हि मागाया दे मति, जन्मांतरी हि महिमा गाया." ॥७॥

Comments

Popular posts from this blog

कृष्णविजय - अध्याय पंधरावा - भगवंतांनी केलेली बलरामस्तुति (English Translation)

मोरोपंत - केकावली

आर्याभारताच्या वनपर्वाच्या अंतर्गत - नलपर्व​